Thu, Jul 18, 2019 16:53होमपेज › Sangli › बनावाची पाळेमुळे शोधा : संभाजी भिडे

बनावाची पाळेमुळे शोधा : संभाजी भिडे

Published On: Jan 05 2018 11:15AM | Last Updated: Jan 05 2018 11:15AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथे एक जानेवारीला घडलेल्या घटनेप्रकरणी माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. त्याप्रकरणी मी कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, हा सर्व बनाव असून त्याची सखोल चौकशी करून त्याची पाळेमुळे शोधावीत अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकातून केली आहे.

संभाजी भिडे यांच्यावर ­­­भीमा-कोरेगाव येथे घडलेल्‍या हिंसाचारास जबाबदार असल्‍याचा आरोप ठेवून त्‍यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्‍यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून भीमा-कोरेगावमधील हिंसाचारातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 

वाचा : आरोपीसमोर हात जोडणे कोणत्‍या कायद्यात? : आव्हाड(व्हिडिओ) 

संभाजी भिडे यांनी प्रसिध्द केल्‍या पत्रकात म्‍हटले आहे की, ‘‘भीमा-कोरेगाव  दंगलीत मी उपस्थित होतो व कारणीभूत आहे, असे विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यांनी निराधार आरोप करून गुन्हा नोंद केला आहे. शासनाने या घटनेची म्हणजेच बनावाची पाळेमुळे शोधून चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा द्यावी.’’