Tue, Jul 23, 2019 06:29होमपेज › Sangli › मिरजेत रेल्वेतच महिलेने दिला बाळाला जन्म

मिरजेत रेल्वेतच महिलेने दिला बाळाला जन्म

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 11:41PM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

यशवंतपूर-अजमेर एक्स्प्रेस या रेल्वेतून प्रवास करणार्‍या राजस्थानच्या एका महिलेने रेल्वेतच मुलाला जन्म दिला. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

राजस्थानातील एक दाम्पत्य   रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करीत होते. आज दुपारी रेल्वे मिरज स्थानकात येत होती. त्यावेळी त्या महिलेच्या पोटात दुखू लागले. रेल्वे मिरज स्थानकात थांबली. ‘कोणी डॉक्टर आहे का,’ असे स्थानकात पुकारण्यात आले. एक महिला डॉक्टर तेथे उपस्थित होत्या. त्या डब्यात गेल्या. त्या डब्यातच चादर लावून आडोसा करण्यात आला. काही वेळातच मुलाचा जन्म झाला. बाळ व बाळंतीण महिला सुखरूप होती. त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे ही रेल्वे मिरजेत 40 मिनिटे थांबून होती.