Fri, Jul 19, 2019 05:39होमपेज › Sangli › कार अपघातात तरुणी ठार, सातजण जखमी

कार अपघातात तरुणी ठार, सातजण जखमी

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 16 2018 1:21AMनिंबळक : वार्ताहर

आळते (ता. तासगाव) येथील विटा-तासगाव रोडवर कारला झालेल्या अपघातात एक तरुणी ठार व सात जखमी झाले आहेत. तृप्ती संतोष तांबे (वय 23 रा. निरगुडी, ता. फलटण)  असे त्या तरुणीचे नाव आहे. कारचा टायर फुटल्याने गाडी दगडावर आदळल्याने हा अपघात झाला. 

या अपघातात वाहनचालक संतोष विलास तांबे (वय 26) , वैभव आनंदा सपकाळ (वय 24), अमित लक्ष्मण सपकाळ (वय 24), अभिजित लक्ष्मण सपकाळ (वय 28), लक्ष्मण महादेव सपकाळ (वय 50) छाया लक्ष्मण सपकाळ (वय 46, सर्व रा. निरगुडी, ता.फलटण )हे प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना विट्यातील  ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निरगुडी (ता. फलटण) येथील भाविक कारमधून ( एम.एच. 11 बीव्ही 9485) नृसिंहवाडीला  दर्शनासाठी चालले होते.  आळते  येथे या गाडीचा पुढील चाकाचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांवर जोरात धडकली. नंतर गाडी  25 ते30 फूट उडून बाजूला असणार्‍या झाडावर आदळली. जोरदार धडकेमुळे गाडीचा चक्काचूर झाला. प्रवासी जखमी झाले. 

तृप्ती  तांबे ही तरुणी गंभीर जखमी झाली.  उपचारासाठी नेत असतानाच तिचा मृत्यू  झाला. तासगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. हवालदार महेश निकम व रूपनर तपीस  करीत आहेत.