Sat, Sep 22, 2018 06:55



होमपेज › Sangli › अन्नभेसळ करणार्‍यांवर मोकापर्यंतची कारवाई      

अन्नभेसळ करणार्‍यांवर मोकापर्यंतची कारवाई      

Published On: Dec 06 2017 2:55PM | Last Updated: Dec 06 2017 2:55PM

बुकमार्क करा





सांगली : प्रतिनिधी

दुधापासून विविध खाद्य पदार्थ आणि अन्नातील भेसळीचा  प्रकार गंभीर आहे. त्यामुळे राज्य सराकारने हा विषय गांभिर्याने घेतला असून, अन्नामध्ये भेसळ केलेला दोषी आढळणार्‍यांनतर  निलंबनापासून मोकापर्यंतची  कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, औषध आणि संसदीयक कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी दिली. 

सांगलीत आयोजित करण्यात आलेल्‍या पत्रकार परिषदेत बापट बोलत होते. राज्यातील सर्व शिधापत्रिका आधारशी जोडण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 12 हजार बोगस  शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. अशी माहितीही बापट यांनी दिली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, निता केळकर आदी उपस्थित होते. 

बापट यांनी जिल्ह्यातील पुरवठा विभागाचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘विविध विभागातील कायदे हे केद्रीतील तरतूदीनुसार आहेत. यापैकी अनेक कायदे बदलत्या काळानुसार कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे यातील दोषींवर कारवाई करताना मर्यादा येतात. हे कायदे बदलण्यासंदर्भात केंद्रीय गृहविभागाबरोबर आमची चर्चा सुरू आहे. कायद्यात बदल करून कडक शिक्षा होण्यासाठी आमचा प्रयत्न सूरू आहे.’’ 

ते म्हणाले, ‘‘शंभर टक्के आधार जोडणीचे काम तीन महिन्यात पूर्ण होईल. वृद्ध लोकांना अंगठ्या ऐवजी डोळ्यांची बुबूळ आधारला लिंक  करण्यात येत आहे. राज्यातील 52 हजार रेशन दुकानदारांचे काम ऑनलाईन सूरू झाले आहे. बायोमेट्रीक मशिनमुळे राज्यातील कोणत्या दुकानात काय सूरू आहे, याची माहिती कोणत्याही ठिकाणी बसून मिळते. गोदामे ऑनलाईन झाली आहेत. त्यामुळे मनुष्यबळ कमी लागत आहे. त्‍यामुळे गैर व्यवहाराला आळा बसणार आहे. बेकायदा शिधापत्रिका देणार्‍यांच्यावर कारवाई करण्यात येईल.