Tue, Jun 18, 2019 20:17होमपेज › Sangli › मिरजेत ७ जणांच्या टोळीवर सावकारीचा गुन्हा  

मिरजेत ७ जणांच्या टोळीवर सावकारीचा गुन्हा  

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:00AMमिरज : शहर प्रतिनिधी

कर्जाच्या व्याजापोटी घर व जागा स्टँपवर लिहून देण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी सात जणांच्या टोळी विरुद्ध गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सावकार संतोष कोळी, प्रवीण शितोळे (दोघे रा. मिरज) या दोघांना रात्री अटक करण्यात आली.   

सागर वासुदेव गोखले (वय 46, रा. दत्त कॉलनी, मिरज) यांनी तक्रार दिली आहे. संतोष कोळी, प्रवीण शितोळे, राजू कदम (रा. मिरज), राजूचा मेहुणा (रा. चिकोडी), कराडे (रा. मिरज), तुकाराम आंबोळे (रा. लंगोटे मळा, इचलकरंजी), राजू कदमच्या घराजवळ राहणारा पिंटू रिक्षावाला या सात जणांकडून गोखले यांनी मार्च 2017 मध्ये सुमारे 5 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यासाठी 20, 10 आणि 7 टक्के व्याजाने वेगवेगळे कर्ज घेतले होते.

त्यानंतर व्याजापोटी गोखले यांनी त्यांना काही रक्कम परत दिली होती. मात्र त्यानंतरही ते सर्वजण गोखले यांना धमकी देत होते. ‘घरातील वस्तू उचलून नेऊ, घर व जागा स्टँपवर लिहून दे’, असे म्हणून त्यांच्याकडे त्यांनी तगादा लावला होता. 

तुकाराम आंबोळे याने गोखले यांची दुचाकीही काढून घेतली होती. त्यानंतर या सावकारी जाचाला कंटाळून गोखले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी संतोष कोळी, प्रवीण शितोळे, राजू कदम, राजूचा मेव्हुणा, कराडे, तुकाराम आंबोळे, पिंटू रिक्षावाला या सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. रात्री कोळी व शितोळे या दोघांना अटक केली. त्या दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Tags : sangli news, Miraj, 7 people gang,  Crime of lender,