Mon, Sep 24, 2018 11:11होमपेज › Sangli › युवकांच्या लगेच सुटकेची शक्यता धूसर

युवकांच्या लगेच सुटकेची शक्यता धूसर

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 10 2017 11:58PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघांची फसवणूक झालेल्या युवकांबाबत मलेशियातील न्यायालयात मंगळवार (दि. 12) सुनावणी होणार आहे. यासाठी मुलांच्या पालकांनी काही मित्रांच्या मदतीने तेथील वकील नियुक्त केला आहे. मात्र मलेशियात सोमवारी शासकीय सुटी असल्याने मंगळवारी त्यांची सुटका होण्याची शक्यता धूसर बनली आहे. 

सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ पवारसह त्याचा साथीदार धीरज पाटीलने मलेशियात नोकरीच्या अमिषाने चार युवकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ गेल्या पंधरा दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे मलेशियात अडकलेल्या युवकांच्या पालकांनी भारतीय दुतावासाशी संपर्क साधला होता. 

मात्र भारतीय दुतावासाने मदत देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यानंतर पालकांनी मलेशियातील काही मित्रांच्या मदतीने एका स्थानिक वकिलांची नियुक्ती केली आहे. मात्र शनिवारी आणि रविवारी सुटी असल्याचे त्या वकिलांना या प्रकरणाची माहिती घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे सोमवारी ते माहिती घेणार आहेत. पण मलेशियात सोमवारीही सुटी असल्याने त्यांना माहिती मिळण्यास अडचण येण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे मंगळवारी होणार्‍या पहिल्या सुनावणीत त्यांची सुटका होण्याची शक्यता धूसर बनली आहे.