Sun, Jul 05, 2020 22:32होमपेज › Sangli › मिरजेत फ्लॅट फोडून चार लाखांचे दागिने लंपास 

मिरजेत फ्लॅट फोडून चार लाखांचे दागिने लंपास 

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:03AM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

येथील ब्राह्मणपुरीतील एका  अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी साडेबारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व पंचवीस हजार रुपये असा चार लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रकार घडला. याच अपार्टमेंटमधील  आणखी एक फ्लॅट फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. याबाबत अभय हणमंत पागनीस यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

अभय  दिंडीवेसजवळील गजानन मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या शिवकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहतात. अभय  आज नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेले होते. त्यांची पत्नी मुलाला  आणण्यासाठी शाळेत गेली होती. वीस मिनिटांनी मुलाला घेऊन त्या घरी आल्या. फ्लॅटचा कडीकोंयडा तोडून कपाटातील ड्रॉव्हरमधील साडेबारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 25 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी श्वानपथकाच्या सहाय्याने  तपास करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याच अपार्टमेंटमधील  आणखी एक फ्लॅट फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. दरवाजा लोखंडी असल्याने तो फोडता आला नाही.