Thu, Apr 25, 2019 23:26होमपेज › Sangli › माजी मंत्री जयंत पाटील यांना मातृशोक

माजी मंत्री जयंत पाटील यांना मातृशोक

Published On: Dec 29 2017 3:43PM | Last Updated: Dec 29 2017 4:35PM

बुकमार्क करा
सांगलीः प्रतिनिधी

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पत्नी व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई पाटील यांचे (वय ८५) शुक्रवारी दुपारी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात आमदार जयंत पाटील, उद्योगपती भगत सिंग पाटील ही दोन मुले तसेच राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, पुणे येथील विजया फत्तेसिंग जगताप, अहमदनगर येथील नीलिमा नरेंद्र घुले पाटील या तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कुसुमताई पाटील यांच्यावर मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी पावणे दोन वाजता त्यांचे निधन झाले. कुसुमताई पाटील यांचा जन्म १९२२ साली कराड तालुक्यातील चरेगाव येथे झाला होता. २६ मे.१९४६ रोजी त्यांचा लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याबरोबर विवाह झाला होता. राजारामबापू यांच्याबरोबर अडतीस वर्षे त्यांचा संसार झाला. राजारामबापूंच्या निधनानंतर आजपर्यंत त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला होता. ३० डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता कासेगाव येथे त्यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.