Wed, Nov 13, 2019 12:42होमपेज › Sangli › दोन गटांत हाणामारी; १३ जणांना अटक 

दोन गटांत हाणामारी; १३ जणांना अटक 

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 13 2019 1:36AM
सांगली : प्रतिनिधी

अंकली (ता. मिरज) येथे दोन गटांत किरकोळ कारणातून जोरदार  हाणामारी झाली. मंगळवारी रात्री एकमेकाला शिवीगाळ करीत विटा आणि लाथाबुक्यांनी मारहाण झाली.  याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांच्या 13 जणांना अटक केली आहे.  

एका गटातील सागर नामदेव जाधव, उज्वला सागर जाधव, योगेश नामदेव जाधव, शालन नामदेव जाधव,  तेजस्वीनी योगेश जाधव, दर्शना सागर जाधव, नामदेव पांडुरंग जाधव यांना अटक झाली आहे. दुसर्‍या गटातील  शशिकांत रामचंद्र जाधव, मयुरी शशिकांत जाधव, सोनल शशिकांत जाधव, सुलोचना अशोक जाधव,  दीपक रामचंद्र जाधव, भाग्यश्री दीपक जाधव यांना अटक केली आहे. मयुरी शशिकांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेे आहे की, घरासमोर पायरीचे बांधकाम करताना आम्हाला अडथळा केला. अंगावर धावून येत अश्‍लील शिवीगाळ केली.   उज्ज्वला जाधव, योगेश जाधव, शालन जाधव, तेजस्विनी जाधव, दर्शना जाधव, नामदेव जाधव यांनी मयुरी आणि मुलगी   सोनल व  पती शशिकांत जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसात तक्रार देण्यासाठी जाताना   गाड्या आडव्या उभ्या करून  रस्ता अडविला.   

उज्वला जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की  बांधकाम करताना   हरकत घेऊन सागर जाधव याने   पायरीची वीट काढून  शालन नामदेव जाधव यांच्या डोक्यात   मारली. त्या गंभीर जखमी झाल्या. त्याशिवाय मुलगी,   पती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.