Sun, Aug 25, 2019 04:32होमपेज › Sangli › मिरजेत दोन गटात चाकूने  मारामारी : चौघे जखमी

मिरजेत दोन गटात चाकूने  मारामारी : चौघे जखमी

Published On: Mar 01 2018 1:28AM | Last Updated: Feb 28 2018 11:43PMमिरज : शहर प्रतिनिधी

येथील शास्त्री चौकाजवळ असणार्‍या पिरजादे प्लॉटजवळ दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत चाकूचाही वापर करण्यात आला. चौघे जण जखमी झाले यात. बुधवारी सात वाजण्याच्या सुमारास मारामारीचा हा प्रकार घडला.  येथील शास्त्री चौकाजवळ असणार्‍या एका मशिदीजवळ दोन गट एकमेकांना भिडले. त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली.

यामध्ये अल्लाबक्ष जातकार (वय 30), हाजीसाब जातकार (वय 42, दोघे रा. शास्त्री चौक, मिरज) व दस्तगीर जातकार (वय 28), अबू जातकार (वय 25, रा. शास्त्री चौक) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारामारीचा हा प्रकार समजताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार व अन्य पोलिस घटनास्थळी दाखल झाले. निरीक्षक शेलार यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. रात्री उशीरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल नव्हता.