Thu, Mar 21, 2019 16:12होमपेज › Sangli › चाकूच्या धाकाने विद्यार्थ्याला लुटले 

चाकूच्या धाकाने विद्यार्थ्याला लुटले 

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:07AMमिरज : शहर प्रतिनिधी 

चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून येथील एका विद्यार्थ्याला लुटण्यात आले. याप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी इजाज हुसेन बागवान (वय 20), मुस्तफा हुसेन बागवान (वय 21, दोघे रा. मिरज) यांना सोमवारी अटक केली. 

याबाबत गणेश शिवानंद गुरव (रा. माणिकनगर,  मिरज) या विद्यार्थ्याने तक्रार दिली आहे. गणेश हा दि. 7  रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मिरज स्टेशन रस्त्यावरील स्टेशन डेपो झोपडपट्टीकडून चालत जात होता.  यावेळी  इजाज, मुस्तफा व अन्य एक अशा तिघांनी गणेशला अडवले. त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या खिशातील मोबाईल व एक हजार रुपयांची रोकड काढून घेतली. 

सोमवारी गणेश याने तक्रार दिल्याने तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी इजाज व मुस्तफा या दोघांना अटक केली. त्यांना मिरज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अन्य एक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.