Wed, Feb 20, 2019 12:46होमपेज › Sangli › नात्‍याला काळीमा : बापाकडून मुलीवर बलात्‍कार 

नात्‍याला काळीमा : बापाकडून मुलीवर बलात्‍कार 

Published On: Feb 17 2018 9:33PM | Last Updated: Feb 17 2018 9:32PMबांबवडे : वार्ताहर 

बाप आणि मुलीच्या नाल्‍याला काळीमा फासणारी घटना वाळवा तालुक्‍यातील कासेंगाव येथे घडली आहे. बापाने स्‍वत: च्या अल्‍पवयीन मुलीवर बालात्‍कार केल्‍याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबत कासेगाव पालिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, आरोपीला पोलीसांनी रात्री उशीरा अटक केली. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आरोपी गेल्‍या २० वर्षेांपासून कासेगांव येथे शेतमजुरी करतो. पाच महिन्यापूर्वी पत्नी मजुरी करण्यासाठी घराबाहेर गेली असता इयत्ता आठवीत शिक्षत आसलेल्‍या मुलीवर बलात्‍कार केला. पाच महिन्यानंतर  शुक्रवार दिनांक १६ रोजी मुलीच्या पोटात दूखू लागलयाने तिच्या आईने एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्यांनंतर डॉक्टरने ती मुलगी पाच महिन्याची गर्भवती असल्याचे सांगीतले.