Mon, Jun 17, 2019 19:03होमपेज › Sangli › शिरढोणमध्ये शेतकर्‍यांचा चक्का जाम

शिरढोणमध्ये शेतकर्‍यांचा चक्का जाम

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:40PMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

दूध, शेतमालाच्या दरावरून आक्रमक झालेल्या किसान सभेच्या नेतृत्वाखालील शेतकर्‍यांनी आज शिरढोण येथे सुमारे सव्वा तास चक्का जाम केला. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दोन्ही बाजूला सुमारे सहा किलोमीटरच्या रांगा लागल्या. किसान सभेच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी अटक केले.स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, गाईच्या दुधाला 40 रुपये दर द्या, रत्नागिरी-नागपूर, विजापूर-गुहागर महामार्गाच्या जमिनीचे अधिग्रहण थांबवा या मागणीसाठी शिरढोण येथे किसान सभेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

कॉ. उमेश देशमुख म्हणाले, राज्यातील भाजप शासन हे फसवे आहे. शेतकर्‍यांचा आणि कष्टकर्‍यांना संपवण्यासाठी काम सुरू आहे. आता निर्णायक लढा लढला जाईल. दूध आणि शेतमालाला हमीभाव मिळल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही.एम. एस. पाटील म्हणाले, बळीला गाडून वामनाचे उदात्तीकरण करणारे शासन आता उलथवून टाकल्याशिवाय शेतकर्‍यांचे भले होणार नाही.कॉ. डॉ. सुदर्शन घेरडे म्हणाले, नाना पाटलांचा वारसा लाभला आहे. आता शेतकर्‍यांसाठी प्रतिक्रांती उभी केली जाईल.चक्का जाममुळे शिरढोणपासून दोन्ही बाजूला सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे सव्वा तास वाहतूक ठप्प झाली. शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.कॉ. दिगंबर कांबळे, सागर पाटील, गवस शिरोळकर,  नितिन पाटिल, आप्पालाल मुलाणी, उदय पाटील, नामदेव पाटील, दत्ताजीराव शिंदे, नारायण चौगुले, मच्छिंद्र पाटील,, वैभव सरवदे, राहुल मदने, संपत पाटील यांच्यासह शेतकारी उपस्थित होते.