Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Sangli › राजापूर भागात शेतकर्‍यांनी  घेतला मालकतोडीचा पर्याय

राजापूर भागात शेतकर्‍यांनी  घेतला मालकतोडीचा पर्याय

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 9:11PMआंधळी : वार्ताहर 

चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाची वाढ चांगली झाली आहे, तर ऊस  उत्पादन चांगले झाले आहे. मात्र यावेळी  ऊस तोडणी कामगार कमी प्रमाणात आल्याने राजापूर भागातील ऊस क्षेत्र संथ गतीने तोडले जात आहे. याचा फटका आता शेतकर्‍यांना बसू लागला आहे.   

दरम्यान, पर्यायी व्यवस्था म्हणून गावातील शेतकरी एकत्र येऊन स्वत: ऊस तोडून कारखान्याला पाठविण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. या भागातील काही कारखान्यांना  मालक तोड  करून शेतकरी ऊस पाठवू लागले आहेत. दरम्यान, या पर्यायामुळे शेतकर्‍यांना मात्र चांगलाच भुर्दंड बसत असल्याची भागातील प्रतिक्रिया आहे.