Sun, Jul 21, 2019 16:11
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › कारखान्याची बदनामी खपवून घेणार नाही

कारखान्याची बदनामी खपवून घेणार नाही

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 11:38PMशिराळा : प्रतिनिधी

विश्वास कारखान्याच्या प्रगतीमध्ये शेतकर्‍यांचे मोठे योगदान आहे. कारखान्याचा कारभार पारदर्शी आहे. तरीही कोणी कारखान्याकडे वाकड्या नजरेने बघत असेल, हिताला बाधा आणण्याचे उद्योग करीत असतील, तर अशा सभासदांवर कारवाई करण्यासाठी संचालक मंडळ मागे पुढे बघणार नाही. कारखान्याची होणारी बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा  कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिला.

भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलत होते.  उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, सर्जेरावदादा नाईक बँकेंचे संस्थापक हंबीरराव नाईक, बँकेचे अध्यक्ष संजय नाईक, प्रचिती दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक,उपसभापती सम्राटसिंह नाईक, कार्यकारी संचालक राम पाटील, युवा नेते विराज नाईक, चिखलीचे सरपंच राजेंद्र नाईक, माजी सभापती अ‍ॅड भगतसिंग नाईक, विलासराव पाटील उपस्थित होते.

नाईक म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बसतो आहे. सुरवातीच्या काळात शेतकर्‍यांना चांगला ऊसदर देता येईल अशी परिस्थिती होती. कोटा पद्धत बंध होती. ती पुन्हा सुरू केली. बाहेरच्या देशात साखरेला चांगली किंमत होती.त्यावेळी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधने आणली व परवानगी दिली नाही. मात्र साखरेचे दर घसरल्यानंतर निर्यात केलीच पाहिजे असे बंधन आणले. 

ते म्हणाले, साखर उद्योगाबाबत कोणताही चांगला निर्णय दोन्ही सरकारने घेतलेला नाही.नेहमीच कारखानदारी अडचणीत कशी येईल या पद्धतीनेच निर्णय घेतले आहेत. संचालक विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.