Tue, Feb 19, 2019 18:55होमपेज › Sangli › विराज कारखान्यात अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर

विराज कारखान्यात अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 13 2017 12:17AM

बुकमार्क करा

विटा : वार्ताहर

शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन विराज साखर कारखान्याची निर्मिती केली आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञानाचा आधार घेत देशातील पहिला प्रयोग या कारखान्यात सुुरू होत आहे. उसाला योग्य दर आणि अचूक वजन देणार  आहे, अशी ग्वाही कारखान्याचे कार्यकारी संचालक विशाल पाटील यांनी दिली.

आळसंद (ता.खानापूर) येथील विराज केन्स अ‍ॅन्ड एनर्जी लि. या कारखान्याच्या आळसंद कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगीपाटील बोलत होते.  पंचायत समिती सदस्य संजय मोहिते,बलवडीचे सरपंच प्रवीण पवार,उपसरपंच प्रसाद,जयकर साळुंखे पवार,उत्तमराव पाटणकर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून आपल्या भागातल्या शेतकर्‍यांचा ऊस त्यांच्या हक्काच्या कारखान्यास कसा नेता येईल यावर अभ्यास करून विराज कारखाना उभारला आहे. साखर निर्यात करण्याच्या दृष्टीने (जॅगरी शुगर आणि पावडर) त्याची उभारणी केली आहे. कारखान्याचे काम पूर्ण झाले असून 20 ते 25 डिसेंबरपर्यंत तो सुरू होईल. कुठल्याही वजनकाट्यावर वजन करून आणलेली पावती दाखवायची आणि इथे मोळी टाकायची असे पारदर्शी काम होणार आहे. 

ते म्हणाले, ऊस तोडणीबाबतची यंत्रणाही सक्षम आहे. दर, वजन आणि बिलाबाबत कारखान्यात कुठलीही अडचण असणार नाही. या कार्यालयात ऊस नोंदणी सुरू केली आहे. रघुनाथ पवार,प्रशांत पवार, अरविंद गायकवाड, आनंद शिंदे, संपत जाधव, कैलास जाधव, भगवान हारुगडे, विकास मोरे, श्रीकांत शिरतोडे, संजय पवार उपस्थित होते.