Thu, Jan 24, 2019 11:53होमपेज › Sangli › पाण्यासाठी येळावी ग्रामस्थ रस्त्यावर

पाण्यासाठी येळावी ग्रामस्थ रस्त्यावर

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 30 2018 8:31PMतासगाव: प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील येळावी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. विरोधकांच्या धरणे आंदोलनास प्रत्युतर म्हणून सत्ताधार्‍यांनी प्रतिमोर्चा काढला. गावातील जनता मात्र पाण्यापासून वंचितच आहेत.

सोमवारी सकाळी माजी सरपंच जे. पी. साळुंखे व हणमंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांचे धरणे आंदोलनास सुरू झाले. पिण्यासाठी  पाणी द्या, रस्त्यांची दुरुस्ती करा, वॉटर एटीएममधून शुद्ध पाणी द्या, मुख्य  चौकातील पार्किंगची अडचण दूर करा, अशा मागण्या करत धरणे धरले. या धरणे आंदोलनास प्रत्युतर म्हणून उपसरपंच नीलम जाधव यांनी महिला एकत्रित करुन दत्तमाळावर प्रतिमोर्चा काढला. पाणी प्रश्‍नावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडले असले तरी लोक मात्र पाण्यापासून वंचितच आहेत.