Sun, Mar 24, 2019 04:11होमपेज › Sangli › पिण्याच्या पाणीपुरवठा पाईपमध्ये गटारीचे पाणी 

पिण्याच्या पाणीपुरवठा पाईपमध्ये गटारीचे पाणी 

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 10:14PMसोनी  : वार्ताहर

पाटगाव (ता.मिरज) येथे गटारीचे पाणी पिण्याच्या पाईप लाईनमध्ये मिसळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

  गावात आजारांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याचबरोबर गावात कचरा उठाव होत नाही. गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी आठ दिवसात  लक्ष देऊन समस्या सोडवण्याची मागणी भाजपचे मिरज तालुका सरचिटणीस अशोक शिंदे यांनी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. 

पाटगावमध्ये गेल्या महिन्या पासून गटारीमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकीज आहे. त्यामध्ये गटारीचे पाणी मिसळते आहे. तसेच गावामध्ये कचरा उठाव करणे गरजेचे असताना तोही वेळच्या वेळी होत नाही. गावाच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक शौचास बसत असल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे. गावात घाणीचे साम्राज्य असल्याने अनेक साथीचे रोग गावात बळावत आहेत. 

 या बाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांना  याबाबत विचारले असता उडवाउडवी ची उतरे दिली जातात, असेही अशोक शिंदे यांनी सांगितले. माजी उपसरपंच रवी मोरे, तुकाराम पाटील उपस्थित होते.