Mon, May 25, 2020 19:15होमपेज › Sangli › मिरजेत कुत्र्यांचा हल्ला; ५ बालके जखमी

मिरजेत कुत्र्यांचा हल्ला; ५ बालके जखमी

Published On: Dec 01 2017 9:10AM | Last Updated: Dec 01 2017 12:01AM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे भटक्या कुत्र्यांनी गुरुवारी बालकांवर हल्ला करून जखमी केले.  यश राजेंद्र भोसले (वय 6  रा. पवार गल्ली), अथर्व भोरे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, शास्त्री चौक मिरज), अभिषेक सुभाष गोसावी (रा. गोसावी गल्ली, मिरज), सागर चन्नप्पा कांबळे (रा. उत्तमनगर मिरज), मोहंमद छोटू शेख  (रा.कोल्हापूर चाळ, झोपडपट्टी मिरज) अशी जखमींची नावे आहेत. संतप्त नागरिकांनी त्या कुत्र्याला ठार मारून आरोग्याधिकार्‍यांच्या केबिनमध्ये टाकले.

येथील शास्त्री चौक साठेनगर, पवार गल्ली, उत्तमनगर, नदीवेस या भागात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले आहे. यापूर्वी या भागातील लहान मुलीचे कुत्र्याने लचके तोडले होते. आजही येथे भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांचा चावा घेतला.  गळ्याला, कानाला, पोटाला कुत्र्याने चावा घेतला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महापालिका अधिकार्‍यांना कळवूनदेखील कोणी दखल घेतली नाही. उपायुक्‍त व आयुक्‍त यांनी फोन उचलला नाही.

जिल्हा सुधार समितीच्या वतीने तानाजी रुईकर यांनी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी नितीन मोरे, मुकुंद भोरे, धीरज पोळ, रवींद्र ढोबळे, नीलेश मोरे, रामदास भोरे, ओंकार भोरे, प्रकाश कवाळे, राहुल भोरे, पपू भोरे, अजिंक्य भोरे, नंदा भोरे, सुलोचना भोरे, दीपा मोरे, रोहित काबंळे, अवधूत कांबळे उपस्थित होते.