Thu, Jan 24, 2019 06:09होमपेज › Sangli › जिल्हा बँकेची बेळंकी शाखा फोडण्याचा प्रयत्न 

जिल्हा बँकेची बेळंकी शाखा फोडण्याचा प्रयत्न 

Published On: Mar 15 2018 1:27AM | Last Updated: Mar 15 2018 1:27AMलिंगनूर :

बेळंकी (ता. मिरज) येथे सोसायटी इमारतीत असलेली जिल्हा बँकेची शाखा चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेची तिजोरी फोडता न आल्याने त्यांनी तेथून पळ काढला. चोरट्यांनी बँकेच्या बाहेरील बाजूचा दरवाजा फोडून ग्रील वाकवून आत प्रवेश केला होता.

मात्र, त्यांना रक्‍कम असलेली तिजोरी फोडता आली नाही. हातोडीचे घाव घालूनही तिजोरीचे लॉक चोरट्यांना फोडता आले नाही. त्यामुळे चोरट्यांनी  इतर वस्तूंना हात लावला नाही. संगणक आणि कागदपत्रे सुरक्षित राहिली. विकास सोसायटीच्या लेखनिकाच्या लक्षात हा प्रकार झाला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात सकाळी प्रभारी व्यवस्थापक व रोखपाल ओमासे यांनी गुन्हा नोंद केला. त्यानंतर आज दिवसभर पंचनाम्याचे काम सुरू होते. त्यामुळे आज बँकेचे कामकाज बंदच ठेवले होते, असे ओमासे यांनी सांगितले.