Thu, Nov 15, 2018 07:36होमपेज › Sangli › कर्जमाफीची दुबार नावे वगळली

कर्जमाफीची दुबार नावे वगळली

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:04PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

कर्जमाफीच्या चौथ्या टप्प्यातील दुबार नावे वगळली आहेत. दरम्यान, या यादीतील पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान लाभ शुक्रवारपासून दिला जाणार आहे. जिल्हा बँक व विकास सोसायटी स्तरावर कार्यवाही सुरू आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत चौथ्या टप्प्यातील सुधारित यादीत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान व ‘ओटीएस’साठी 19 हजार शेतकर्‍यांची यादी जिल्हा बँकेला आली होती. मात्र या यादीत अनेक त्रुटी आढळल्या. सात ते आठ हजार शेतकरी ‘डबल लाभार्थी’ ठरले. दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील यादीत नाव असताना पुन्हा चौथ्या टप्प्यातील यादीत नाव आले.  दुबार आलेली नावे  वगळली आहेत.  दुबार लाभार्थी नावे सोडून पात्र लाभार्थींना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान देण्यास सुरूवात झाली आहे. ही प्रक्रिया संपल्यानंतर चौथ्या यादीतील दुबार लाभार्थींची संख्या समजू शकेल, असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले. 

कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचे 177 कोटी रुपये शासनाकडून जिल्हा बँकेला आलेले आहेत. त्यापैकी सुमारे 15 ते 16 कोटी रुपये शिल्लक आहेत. चौथ्या टप्प्यातील यादीतील पात्र शेतकर्‍यांना या रकमेतून लाभ दिला जाणार आहे.  आणखी रकमेची गरज भासली तर शासनाकडून तातडीने उपलब्ध होईल. रक्‍कम शिल्लक राहिली तर परत शासनाकडे परत पाठविली जाईल. दरम्यान काही शेतकर्‍यांना दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या टप्प्यातील यादीत टप्प्या-टप्प्याने रक्‍कम आली आहे. ही एकत्रित रक्‍कम पात्र लाभाएवढी असेल तर लाभाची रक्‍कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली दिला जाणार आले.