Fri, Sep 21, 2018 12:07



होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे  सांगली, मिरजेमध्ये  ‘झुंबा वर्कशॉप’

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे  सांगली, मिरजेमध्ये  ‘झुंबा वर्कशॉप’

Published On: Dec 30 2017 12:44AM | Last Updated: Dec 29 2017 9:07PM

बुकमार्क करा




सांगली : प्रतिनिधी 

आजकालच्या धकाधकीच्या  व धावत्या जगात आपण स्वत:ला वेळ देणे विसरून जातो आणि मग पाठीमागे लागतात अनेक आजार व विकार.म्हणूनच दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब खास कस्तुरी मेंबरसाठी झुंबा वर्कशॉप घेऊन येत आहे. 

दि. 1 जानेवारी  ते 5 जानेवारी या नवीन वर्षांत एक नवीन संकल्प घेऊन महिलांसाठी ही संधी  दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब व प्रदीप सातपुते फिटनेस अ‍ॅकॅडमी मिरज देत आहेत. प्रदीप सातपुते  फि टनेस अ‍ॅकॅडमी ही गेली  पाच वर्षे मिरज येथे अविरत  कार्यरत आहे.  वर्कशॉपमध्ये शिकविले जाणारे झुंबा वर्कशॉपसाठी मिरज मधील महिला नाव नोंदवू शकतात. तसेच कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी करू शकतात. 1 ते 5 जानेवारी मिरज येथे वर्कशॉप होणार आहे. तसेच  6 जानेवारी   ते 11 जानेवारीस  सांगली येथे  झुंबा वर्कशॉप होणार आहे.  झुंबा वर्कशॉपसाठी  कस्तुरी महिलांना  प्रवेश  50 रुपये  राहील. इतर महिलांना  200 रूपये प्रवेश फी राहील.  महिला कस्तुरी सभासद नोंदणी कार्यक्रमाच्या ठिकाणी करू शकतात.  झुंबा वर्कशॉप साठी पत्ता  मिरज ः प्रदीप सातुपते फिटनेस अ‍ॅकॅडमी बाळकृष्ण कॉम्प्लेक्स, तिसरा मजला,  शिवाजीनगर रोड,  मिरज. सांगली वृत्तपत्र विक्रेता भवन, त्रिकोणी बागेजवळ सांगली. 

यावेळी कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये आहे. सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार 
आहे. 

सभासद महिलांना वर्षभर तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत.