Sat, Nov 17, 2018 12:04होमपेज › Sangli › कळंबीजवळ अपघातात देशिंगचे दाम्पत्य ठार 

कळंबीजवळ अपघातात देशिंगचे दाम्पत्य ठार 

Published On: Feb 10 2018 1:36AM | Last Updated: Feb 09 2018 11:15PMमिरज : शहर प्रतिनिधी 

मिरज-पंढरपूर रस्त्यावर दुचाकीवरून जाणार्‍या दाम्पत्याला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दोघेही जागीच ठार झाले. विद्या रामचंद्र चव्हाण (वय 35) आणि रामचंद्र चव्हाण (वय 45, रा. देशिंग ता. कवठेमहांकाळ) अशी     त्यांची नावे आहेत. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. चव्हाण दाम्पत्य  गुरुवारी कुपवाड येथे जेवणासाठी गेले होते.  रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते  दुचाकी ( एमएच- 10-आर.-3794) वरुन परत निघाले होते. कळंबीजवळ समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला  ठोकर दिली. वाहनचालक  पसार झाला. अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

 मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे हवालदार यु. सी. कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. याबाबत ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.