Fri, Jan 18, 2019 12:56होमपेज › Sangli › सोनसळमध्ये उसळला जनसागर

सोनसळमध्ये उसळला जनसागर

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 10 2018 11:47PMदेवराष्ट्रे : वार्ताहर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री मुंबईमध्ये लीलावती रूग्णालयात निधन झाले. शनिवारी त्यांच्या जन्मगावी सोनसळ येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी  आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी अक्षरश: जनसागर लोटला होता.  पार्थिव  त्यांच्या निवासस्थानी येताच महिला व कार्यकर्त्यांनी आक्रोश केला. ‘पतंगराव कदम अमर रहे’ च्या घोषणा देण्यात आल्या.

डॉ. कदम यांचे पार्थिव शनिवारी दुपारी पुण्यातून हेलिकॉप्टरने सोनसळ येथे आणण्यात आले. तेथून फुलांनी सजविलेल्या रथातून ते  निवासस्थानी नेण्यात आणले.  त्यावेळी महिलांनी हंबरडा फोडला. युवकांनी ‘डॉ. पतंगराव कदम अमर रहे’ च्या घोषणा दिल्या. यावेळी डॉ.कदम यांचे   बंधू आमदार मोहनराव कदम,  जयसिंगराव कदम यांना अश्रू  अनावर झाले होते.