Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Sangli › विकास सोसायट्या सक्षम होण्याची गरज

विकास सोसायट्या सक्षम होण्याची गरज

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 02 2018 11:42PMमांगले : वार्ताहर

विकास सोसायट्या या जिल्हा बँकेचा पाया आहेत, त्या सक्षम झाल्या तर बँक समृध्द  होईल. यासाठी  जिल्हा बँकेने विकास सोसायट्यांना  भक्कम करण्याचे धोरण ठेवले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले.

मांगले येथे मांगले विकास सोसायटीचा शतकपूर्ती महोत्सव व पाणी फिल्टर युनिट उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते. आमदार  शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख,  ज्येेष्ठ नेते शंकरराव चरापले प्रमुख उपस्थित होते. दिलीप पाटील म्हणाले, ज्येष्ठ  नेते शंकरराव चरापले यांच्या  पन्नास वर्षाच्या कुशल मार्गदर्शनामुळे ही संस्था सक्षमपणे  शेतकर्‍यांना मदत करत आहे. आ. नाईक म्हणाले,  शंकरराव चरायले यांचे  गावच्या विकासासाठी मोठे योगदान आहे.  सत्यजित देशमुख म्हणाले, शंकरराव चरापले यांनी अत्यंत संघर्षातून वाटचाल केली आहे. आ. शिवाजीराव देशमुख यांना प्रामाणिकपणे, निष्ठेने साथ दिली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  हणमंतराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.


 डॉ. संतोष चरापले यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या पाणी फिल्टर युनिटचे उद्घाटन  झाले. माजी आमदार  विनय कोरे, शंकरराव चरापले, सत्यजित देशमुख, उदयसिंग नाईक, डॉ. संतोष चरापले, रणजित नाईक, हणमंतराव पाटील,  जिल्हा बँक संचालिका डॉ. सौ. श्रद्धा चरापले, सौ. उषाताई चरापले, अध्यक्ष संपतराव चरापले, सरपंच सौ. मीना बेंद्रे, उपसरंपच धनाजी  नरुटे, सुरेश पाटील, अभिजित पाटील उपस्थित होते. अधिक चरापले यांनी आभार
मानले.