Fri, Apr 26, 2019 03:26होमपेज › Sangli › राज्यात २२ भ्रष्ट मंत्र्यांना क्लिनचिट : जयंत पाटील

राज्यात २२ भ्रष्ट मंत्र्यांना क्लिनचिट : जयंत पाटील

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 3:57PM

बुकमार्क करा
इस्लामपूर : प्रतिनिधी

भाजप सरकारच्या अस्थिरपणाचे आणि भाजप-शिवसेनेमधील अविश्‍वासाच्या वातावरणाचे रहस्य राष्ट्रवादीने राज्य सरकार स्थापनेवेळी या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयामध्ये आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. सरकारमधील २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून, देखील मुख्यमंत्र्यांकडून त्यांना ‘क्‍लीन चिट’ दिली जात असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे. 

विरोधी पक्षांनी सामंज्यस्यपणाची भूमिका घेतली तर, येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ता परिवर्तन व्हायला काहीही अडचण येणार नाही, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, 'शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी भाजपला कधीही पाठींबा देणार नाही. भाजप सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादीने या सरकारला बाहेरून पाठींबा द्यायचा निर्णय प्रथम घेतला. त्याचे कारण म्हणजे आम्ही पाठींब्याचे बाहुले सोडल्यानेच शिवसेना-भाजपमध्ये गैरविश्‍वासाचे वातावरण निर्माण होऊन हे सरकार आजपर्यंत अस्थिर राहिले आहे.'

मंत्रिमंडळातील मंत्रीही निष्क्रीय आहेत. 22 मंत्र्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होवूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्‍लिन चीट दिली आहे. प्रकाश मेहता यांच्यावर प्रथमदर्शनी भ्रष्टाचाराचे आरोप होवूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. लोकायुक्तांनी त्यांच्यावर ठपका ठेवला. अशा मंत्र्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा आरोप आमदार पाटील यांनी केला.  

आमदार पाटील, 'गुजरात निवडणुकीच्या निकालावरून असे दिसते की साम, दाम, दंड नितीचा वापर करून भाजपने सत्ता मिळविली. या सरकारने निवडणुकीत दिलेले कोणतेच आश्‍वासन पाळले नसल्याने जनतेत प्रचंड असंतोष आहे. हा असंतोषच पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्ता मिळवून देवू शकतो. फक्‍त दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी.'

निधी नाही, विकास नाही...

भाजप सरकारला कोणताही चेहरा नाही, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, 'सरकारने वारेमाप घोषणा केल्या. मात्र निधी दिला नाही. हे जनतेच्या लक्षात आल्याने जनतेचा रोष वाढला आहे. जीएसटी, नोटाबंदीमुळे, महसुलात घट झाली आहे. त्यामुळे 30 टक्के विकासाच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. आजपर्यंत या सरकारने दाखविण्यासारखे एकही काम केलेले नाही.'