होमपेज › Sangli › मिरजेत नागरिकांनी कर्नाटक पोलिसांना अडविले

मिरजेत नागरिकांनी कर्नाटक पोलिसांना अडविले

Published On: Jan 03 2018 1:17AM | Last Updated: Jan 02 2018 11:22PM

बुकमार्क करा
मिरज : शहर प्रतिनिधी

मोबाईल चोरी प्रकरणातील संशयिताला घेऊन जाताना कर्नाटक पोलिसांची गाडी येथे अडविण्यात आली. ती गाडी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर ठाण्याच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. 

धारवाड येथे मोबाईल चोरट्याला तेथील पोलिसांनी अटक केली होती. चोरीतील काही मोबाईल त्याने मिरजेतील मोबाईल व्यावसायिकांना विकल्याची कबुली दिली होती. त्यावरून तपास करण्यासाठी आज दुपारी धारवाडचे पोलिस मिरजेत आले. त्यांनी काही ठिकाणी छापे टाकले. सर्फराज दरवंदर (रा. माळी गल्ली, मिरज) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला ताब्यात घेऊन पोलिस कागवाडमार्गे कर्नाटकच्या दिशेने जात होते. मिरजेतील काही तरुणांनी ती गाडी अडवण्यात आली. पोलिस आणि संशयिताला घेऊन शहर पोलिस ठाण्यात आले. त्यामुळे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी खात्री करून संशयिताला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.