Tue, Feb 19, 2019 06:00होमपेज › Sangli › मुख्यमंत्र्यांना तालुक्यात फिरकू देणार नाही

मुख्यमंत्र्यांना तालुक्यात फिरकू देणार नाही

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 26 2018 1:39AMइस्लामपूर : शहर वार्ताहर

सरकारने  आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारमधील काही मंत्री मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  तालुक्यात फिरकू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्यावतीने  देण्यात आला आहे. येथील विश्रामगृहामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. पदाधिकारी म्हणाले, मराठा समाजाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या बांधवाने जलसमाधी घेतली. ही आत्महत्त्या शासन, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे घडली आहे. यामुळे मराठी समाज बांधवांच्यात संताप आहे. 

शनिवारी इस्लामपुरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारी पंचायत समिती परिसरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. जुन्या तहसील कार्यालयाशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता केली जाणार आहे. रविवारी सकाळी पेठ-सांगली रस्ता रोको करण्यात येणार आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, संयोजन समितीचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.