Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Sangli › महसूलमंत्र्यांकडून आमिष; निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार : पाटील

महसूलमंत्र्यांकडून आमिष; निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार : पाटील

Published On: Feb 10 2018 1:36AM | Last Updated: Feb 09 2018 11:02PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला लाणार हे उघड आहे. खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भाजपच्या मेळाव्यात पदाधिकार्‍यांना भेटवस्तू देण्याचे आदेशही दिले आहेत. याबद्दल त्यांच्याविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

ते म्हणाले, सांगलीची जनता स्वाभिमानी असून ती विकली जाणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 28 नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा ना. पाटील यांनी पुन्हा भाजप मेळाव्यात पुनरुच्चार केला. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक भाजपमध्ये जाणार नाही. यासंदर्भात आमची आजच बैठकही झाली. सर्वजण आमदार जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम आहेत. 

पाटील म्हणाले, पालकमंत्री या नात्याने काहीजण वैयक्तिक कामासाठी मंत्र्यांना भेटत असतात. म्हणून ते पक्षात गेले असे होत नाही. चंद्रकांत पाटील यांनी सत्तेच्या पोकळ वल्गना सुरू केल्या आहेत. महापालिकेवर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल.

तुमच्या होमपिचवर सपाटून पराभव
कमलाकर पाटील म्हणाले, मंत्री पाटील महापालिकेत भाजपची सत्ता येईल. आम्ही सर्व्हे केला आहे, असे सांगतात. पण त्यांची भविष्यवाणी होमपिचवर कोल्हापूर विधानपरिषद, महापालिका निवडणुकीत का चुकली? सांगलीबाबतही त्यांचा सर्व्हे  निराशाजनक आहे. त्याचा गौप्यस्फोट आम्हाला करायला लावू नका. सांगली मनपा निवडणुकीत तुम्हाला उमेदवार मिळणार नाहीतच, येथे भाजपला धूळच चारू.