Mon, Apr 22, 2019 23:48होमपेज › Sangli › सांगलीकरांनी घेतले शतकातील रेडमून बरोबर रेड प्लॅनेटचे दर्शन

सांगलीकरांनी घेतले शतकातील रेडमून बरोबर रेड प्लॅनेटचे दर्शन

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 11:17PMसांगली : प्रतिनिधी

आषाढी पौर्णिमेदिवशी शतकातील खग्रास चंद्रग्रहणाचा आस्वाद सांगली, मिरज, कुपवाड, कवठेमहांकाळ येथील नागरिकांनी घेतला. तेजःपुंज असा रेडमून पहाताना सांगलीकर भारावून गेले. परंतु ढगामुळे सर्व काळ या ग्रहणाचा आस्वाद घेता आला नाही.  

या चंद्रग्रहणाबाबत गेले महिनाभर सांगली व परिसरात अनेक संस्थांनी नागरिकांमध्ये प्रबोधन सुरू केले होते. अखेर आषाढी पौर्णिमेची रात्र आली. रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरूवात झाली. त्यानंतर काही वेळाने खग्रासस्थिती प्राप्त झाल्यानंतर लाल चंद्राजवळ लाल मंगळाचे दर्शन हा अनोखा योग यानिमित्ताने पहायला मिळाला.  बाहेर पावसाळी वातावरण असल्यामुळे व ढगांचा अडथळा असल्याने सांगलीकरांना सामुदायिकरित्या मैदानावर चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळाली नाही. परंतु अवकाशाविषयी आवड असणार्‍या संस्था, संघटनांनी मोबाईलवरून एकमेकांशी संपर्कात राहून चंद्राच्या वेगवेगळ्या कलांविषयी माहिती दिली. सांगलीत अवकाश अभ्यासक शंकर शेलार यांनी घरातूनच  मोबाईलवरून लोकांचे प्रबोधन करीत होते.  ग्रहण काळात कोणतेही पदार्थ खाऊ नयेत, अशी अंधश्रद्धा आहे. परंतु या काळात अनेकांनी घरात खाद्यपदार्थ खात असल्याची छायाचित्रे  एकमेकांना पाठवून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला.