होमपेज › Sangli › द्राक्ष, बेदाण्यासाठी ‘एक्सपोर्ट हाऊस’: केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू

द्राक्ष, बेदाण्यासाठी ‘एक्सपोर्ट हाऊस’: केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू

Published On: Mar 24 2018 1:54AM | Last Updated: Mar 23 2018 11:29PMसांगली : प्रतिनिधी

द्राक्ष, बेदाण्याच्या मार्केटिंगसाठी प्रभावी प्रचार, प्रसार यंत्रणा निर्माण करण्याबरोबरच ‘एक्सपोर्ट हाऊस’ उभारले जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय व्यापार मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहिती माजीमंत्री अजितराव घोरपडे यांनी दिली. 

केंद्रीयमंत्री प्रभू यांची घोरपडे  यांनी दिल्लीत भेट घेतली. द्राक्ष, बेदाणा मार्केटिंग, प्रचार, प्रसार तसेच निर्यात विषयक आंतरराष्ट्रीय करार, ऑनलाईन ट्रेडिंग, वेब मार्केटिंग यावर चर्चा झाली. महाराष्ट्रातील सांगली व सोलापूर परिसरात द्राक्ष उत्पादन सुमारे 20 लाख टन आहे. बेदाणा उत्पादन 2 लाख टनांहून अधिक आहे. या शेतीमालांना शासनाने ‘जीआय’ सर्टिफिकेशन दिले आहे. द्राक्ष, बेदाणा व्यापारासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा वाव आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाने या शेतीमालाच्या प्रचार, प्रसारासाठी तसेच आंतरराष्ट्रीय करारासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणीचे निवेदन घोरपडे यांनी दिले. 

Tags : Sangli, Sangli News, central minister Suresh Prabhu, expert house, grape and currant