Tue, Jan 22, 2019 03:39होमपेज › Sangli › सांगलीतील अपघातात जयसिंगपूरचे तिघे ठार

सांगलीतील अपघातात जयसिंगपूरचे तिघे ठार

Published On: May 06 2018 5:30PM | Last Updated: May 06 2018 5:30PMजत : पुढारी ऑनलाईन

सांगली-जत रस्‍त्यावर कोकळेजवळ आयशर टेम्‍पो आणि अल्‍टो कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात जयसिंगपूरचे तिघेजण जागीच ठार झाले. जयसिंगपूर येथील ग्राहक संरक्षण मंचचे अध्यक्ष विशाल माळी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. 

अपघातातील मृत तिघेजण जयसिंगपूर येथून जत तालुक्यातील पोफळी येथे लग्‍नासाठी अल्‍टो कारमधून गेले होते. सांगली जत रस्‍त्यावर कोकळेजवळ आयशर टेम्‍पो आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघेजण ठार झाले. इतर मृतांची नावे अद्याप मिळाली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.