Wed, Nov 14, 2018 22:56होमपेज › Sangli › सांगली : माहुलीतील अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

सांगली : अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

Published On: Jun 18 2018 3:03PM | Last Updated: Jun 18 2018 3:03PMविटा : वार्ताहर

भरधाव डंपरने माहुली तालुका खानापूर येथे कारला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत विटा पोलिसांत नंदकुमार माने यांनी वर्दी दिल्यापासून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हा अपघात सकाळी साडेदहाच्या सुमारास माहूली बसस्थानकासमोर घडला. मृतांमध्ये सुरेश किसनराव देवकाते (वय ४५), सुनंदा किसनराव देवकाते (६७) व बबलू सुरेश देवकते (वय ७, सर्व रा. जेजुरी, जि. पुणे, मुळगाव जत) यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विट्याहून माहुलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने माहुली बसस्थानकासमोर सुरेश देवकाते यांच्या कारला समोरून धडक दिली. यामध्ये चालक सुरेश देवकाते त्यांच्या शेजारी बसलेली त्यांची आई सुनंदा देवकाते आणि मुलगा बबलु देवकाते यांचा जागीच मृत्यू झाला, तर सई सुरेश देवकाते (वय ५), शोभा सुरेश देवकाते (वय ४५), आणि स्नेहलता किसनराव देवकाते (वय ४०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या सर्वांवर सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.