Wed, Apr 24, 2019 01:32होमपेज › Sangli › ‘अंजली पाठक बाई’ असलेल्या कारला अपघात; दोन मुले जखमी

‘अंजली पाठक बाई’ असलेल्या कारला अपघात; दोन मुले जखमी

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 26 2018 11:45PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीवाडीत ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील नायिका अक्षया देवधर (अंजली पाठक बाई) असलेल्या कारने दोन मुलांना धडक दिली. रविवारी रात्री ही घटना घडली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. मात्र जखमींची नावे तसेच कारचा क्रमांक मिळाला नसल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले. 

सांगलीवाडीतील एका कार्यक्रमासाठी  देवधर आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना घेऊन जाण्यासाठी संयोजकांनी एका कारची व्यवस्था केली होती. त्या कारची दोन लहान मुलांना धडक बसली. यामध्ये एक मुलगी व एका मुलाचा समावेश आहे. ही घटना घडल्यानंतर संयोजकांनी तातडीने जखमींना खासगी रूग्णालयात दाखल केले.  अपघात झाल्यानंतर काही लोक तक्रार देण्यासाठी सांगली शहर पोलिस ठाण्यात गेले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. मात्र त्यांनी जखमींची नावे तसेच कारचा क्रमांकही सांगितला नसल्याने या अपघाताबाबत पुढील नोंद करण्यात आली नसल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र या घटनेची सोमवारी दिवसभर शहरात जोरदार चर्चा सुरू होती.