Sun, Aug 25, 2019 19:51होमपेज › Sangli › एस.टी. बसच्या धडकेत वृद्ध ठार

एस.टी. बसच्या धडकेत वृद्ध ठार

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 09 2018 12:00AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ एसटी बसने धडक दिल्याने एक वृद्ध ठार झाला. महादेव दत्तात्रय साळुंखे (वय 65, रा. गावभाग) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

साळुंखे कुटुंबासमवेत गावभागात राहत होते. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून जात असताना कोल्हापूरहून सांगलीकडे येणार्‍या बसने त्यांना समोरून जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, बसचा चालक मंगेश हिरवे (रा. मलकापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.