Thu, Jun 27, 2019 17:43होमपेज › Sangli › भिलवडीत तीस एकर ऊस जळाला

भिलवडीत तीस एकर ऊस जळाला

Published On: Feb 07 2018 1:36AM | Last Updated: Feb 06 2018 10:15PMभिलवडी  ; प्रतिनिधी

भिलवडी (ता. पलूस) येथील तीस एकर ऊस जळाला. यामध्ये शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले  नाही. गाळपासाठी कारखान्याकडे जाण्यासाठी तयार उभा तीस एकर ऊस सोमवारी जळून खाक झाला. सोमवारी दुपारी उसाने पेट घेतला. दुपारचे कडक उन व वेगाच्या वार्‍याने आग जोरात पसरली. आगीचे व धुराचे प्रचंड लोट हवेत दिसत होते.  यामध्ये सुनील तुकाराम बंडगर, कमल तुकाराम बंडगर, विमल दत्‍तात्रय पाटील, राहुल रामचंद्र मोकाशी, दादासाहेब गणपती मोकाशी, वासुदेव जगन्नाथ  मोकाशी, सर्जेराव जगन्नाथ मोकाशी, माणिक जगन्नाथ  मोकाशी, जयसिंग जगन्नाथ  मोकाशी, विश्‍वास पांडुरंग मोकाशी, अमृत बाबुराव मोकाशी, श्रीकांत विश्‍वनाथ मोकाशी, सुनील भूपाल मोकाशी यांचा ऊस जळाला.

तर उत्‍तम उमराव मोकाशी, विक्रम उमराव मोकाशी व प्रदीप उत्‍तम मोकाशी यांचा ऊस व ठिबकसंच जळून खाक झाले. यामध्ये सोळा शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ट्रॅक्टर व रोटरच्या सहाय्याने ऊस मध्येच पाडल्याने मोठा अनर्थ टळला.   तलाठ्यांकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, कारखानदारांकडून जळालेला ऊस लवकर तोडला जावा व वजनात कपात करण्यात येवू नये, अशा मागण्या शेतकर्‍यांनी केल्या आहेत.