Wed, Apr 24, 2019 02:20होमपेज › Sangli › लबाड सरकारकडून जनतेची फसवणूक : जयंत पाटील

लबाड सरकारकडून जनतेची फसवणूक : जयंत पाटील

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:20PMआष्टा  : प्रतिनिधी

लबाड भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक होत असल्याची टीका माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केली. सरकारच्या शून्य कारभारामुळे शेतकरी, व्यापारी, दलित, अल्पसंख्यांक आदी  समाजघटक अस्वस्थ झाल्याचे ते म्हणाले.

मिरजवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि ग्रामदैवत लक्ष्मी मंंदिरासमोर आमदार निधी आणि लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या  सभामंडपाचे लोकार्पण सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते. वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजयबापू पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, पं. स. सभापती सचिन हुलवान, जि. प. सदस्य संभाजी कचरे आदी प्रमुख उपस्थित होते. 
ते म्हणाले, बागणी जि. प. मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देऊन ती मार्गी लावली आहेत.   शामराव पाटील, विजयबापू पाटील, राजाराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राजारामबापू बँकेचे संचालक अनिल गायवकवाड यांनी स्वागत केले. सरपंच बिपीनकुमार खोत, उपसरपंच विष्णू सावंत, पोलिस पाटील हरिदास पाटील, वसंत सावंत, पंडित नांगरे, प्रकाश नरुटे, निवास घाईल यांनी संयोजन केले. काशिनाथ खोत यांनी आभार मानले.  

या वेळी मिरजवाडी येथील प्रमुख विरोधी गटातील सोसायटीचे माजी अध्यक्ष विलासराव पाटील, राजाराम  पाटील,  लालासाहेब पाटील, सर्जेराव पाटील, शशिकांत पाटील  कार्यकर्त्यांनी जयंत पाटील गटात जाहीर प्रवेश केला.