Thu, Apr 25, 2019 05:26होमपेज › Sangli › अल्पसंख्यांक विभागाकडून खानापूरला चांगला निधी : पडळकर VIDEO

अल्पसंख्यांक विभागाकडून खानापूरला चांगला निधी : पडळकर VIDEO

Published On: Dec 09 2017 5:11PM | Last Updated: Dec 09 2017 5:13PM

बुकमार्क करा

विटा : विजय लाळे 

खानापूर तालुक्यातील शहरी भागासाठी राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाकडून चांगला निधी मंजूर करवून आणल्याची माहिती भाजपचे नेते आणि स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी दिली.

पडळकर म्हणाले, राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे आम्ही खानापूर विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाबाबतची काही कामे सुचवली होती. यात विट्यातील कराड रस्त्यावरील कबरस्तान पलीकडच्या जागेजवळील मोकळ्या जागेत शादीखाना बांधण्यासाठी १० लाख रुपये आणि खानापूर मध्ये पिरजादे गल्लीतील रस्ता काँक्रीटीकरण आणि संरक्षक भिंत घालणे या कामांच्या साठी ५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.  तसेच नागेवाडी येथील कबरस्तान दुरुस्ती साठी ३ लाख रुपये त्याची यादी चार  दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेली आहे. आणि सोमवारी उर्वरित गावांच्या कामासाठीची आणखी २१ लाख रुपयांच्या मंजुरीची यादी प्रसिद्ध होणार आहे.

 

खानापूर तालुक्यातील गावांनी आपापल्या भागातील अल्पसंख्यांक समाजाची समाज मंदिर , सामाजिक सभागृह , स्मशानभूमी इत्यादी कामांच्या याद्या आमच्या पक्षाच्या शाखा तसेच युवा शाखेकडे आणून द्याव्यात त्याबाबत तातडीने आम्ही सरकारी पातळीवर पाठपुरावा करू असेही पडळकर यांनी सांगितले.