Wed, Nov 14, 2018 19:35



होमपेज › Sangli › तुतारीच्या निनादाने नेतान्याहू भारावले

तुतारीच्या निनादाने नेतान्याहू भारावले

Published On: Jan 18 2018 8:45PM | Last Updated: Jan 18 2018 8:45PM



बांबवडे : वार्ताहर  

नुकत्याच भारत दौऱ्यावर आलेले इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा ह्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना त्यांचे स्वागत तुतारीच्या निनादाने करण्यात आले. बुधवारी मुंबई विमानतळावर वाटेगावचे रहिवाशी असणारे सुप्रसिद्ध तुतारीवादक पांडुरंग गुरव व त्यांच्या साथीदारांनी नेतान्याहू दाम्पत्याचे विशेष स्वागत केले. 

स्वागत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ही महाराष्ट्राची तुतारी' अशी ओळख करून दिली. या तुतारीने परदेशी पाहुणे भारावून गेले व महाराष्ट्राला धन्यवाद दिला. शिवाय तुतारीवादक गुरव आणि साथीदारांची नेत्यान्याहू यांनी दखल घेऊन शाबासकी देत आभारही मानले.

वाटेगावचे पर्यायाने सांगली जिल्ह्याचे नाव गुरव यांनी आपल्या तुतारीच्या कलेने देशासह परदेशातही नेले आहे. त्यांनी शासकीय खर्चाने अमेरिका, मॉरिशस, तर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे सोबत जपान दौरा केला आहे.