Thu, Nov 15, 2018 11:51होमपेज › Sangli › साखरमुळे गूळही घसरला

साखरमुळे गूळही घसरला

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 10:29PMसांगली : प्रतिनिधी

साखरेचे घसरलेले दर आणि गुळाचे वाढलेले उत्पादन याचा परिणाम गूळ दरावर झाला आहे. गुळाचे दर क्विंटलला 50 ते 100 रुपयांनी कमी झाले आहेत. मागणी कमी झाल्याने आवकही निम्म्यावर आली आहे. 

सांगली मार्केट यार्ड हे हळद, गूळ, बेदाण्याची प्रमुख बाजारपेठ आहे. गुळाची वार्षिक आवक 11 लाख क्विंटलपर्यंत असते. गूळ खरेदी-विक्रीची वार्षिक उलाढाल सुमारे 450 कोटींची आहे. सध्या बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली आहे. त्याचा थेट परिणाम गुळाच्या दरावरही झाला आहे. यावर्षी गुळाचे उत्पादन जास्त असल्याची चर्चा व्यापारी वर्गात आहे. गुजरात, उत्तरप्रदेशमध्ये गूळ उत्पादन जास्त आहे. महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठांमध्ये गुळाची आवक आहे. त्याचाही परिणाम गूळ दरावर झाला आहे. आवकही कमी झाली आहे. 

सांगली मार्केट यार्डात दुपारी 1 वाजेपर्यंत गूळ सौदे सुरू असतात. पण सोमवारी सकाळी 11.30 वाजताच सौदे संपले. गुळाची आवक निम्म्यावर आली आहे. सध्या रोज 8 हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. गेल्या आठवड्यात रोज 15 हजार गूळ रव्यांची आवक होती.