Sat, Sep 22, 2018 22:17होमपेज › Sangli › बोरगावचा 'ढाण्या वाघ' बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बोरगावचा 'ढाण्या वाघ' बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

Published On: Jan 16 2018 2:29PM | Last Updated: Jan 16 2018 3:05PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

अन्यायाविरोधात पेटून उठून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बोरगाव (ता. वाळवा) येथील बापू बिरू वाटेगावकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने बापू बिरु यांच्यावर इस्‍लापूर येथील आधार रुग्‍णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले.

चित्रपट, तमाशा आणि पोवाडा या माध्यमातून दखल घेतलेले बापू बिरू बोरगावचे ढाण्या वाघ म्‍हणून प्रसिद्ध होते. कृष्णा खोर्‍यात गोरगरीबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांविरोधात त्यां‍नी आवाज उठवला होता. बोरगाव रेठरे हरणाक्ष, मसुचीवडी, ताकारी परिसरात त्यांची दहशत होती. त्यानंतर गरिबांचा कैवारी म्हणून त्यांच्या जीवानावर आधारित बापू बिरु नावाने सिनेमाही  प्रदर्शित झाला होता. 

बापू बिरूंविषयी थोडक्यात...

बापू बिरू यांना लहानपणापासूनच कुस्‍तीची आवड होती. तसेच गरीबांविषयी कळवळाही होता. बोरगावात रंगा शिंदे गोरगरिबांना त्रास देत होता. गावातील स्‍त्रियांची भर रस्‍त्यात छेड काढत होता. त्याला लोक घाबरत होते. दिवसेंदिवस रंगा उर्मट बनत असल्याने चिडलेल्या बापूंनी रंगा शिंदेला ठार केले. आणि तिथून पुढे बापूंनी अन्यायाविरोधात कायमच दंड थोपटले. 

अन्यायाविरोधात त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे कृष्‍णाकाठी बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू म्‍हणून लोकप्रिय झाले. उतारवयात ते अध्यात्‍माकडे वळले होते. 

संबधित बातमीः असा होता बोरगावचा ढाण्या वाघ