होमपेज › Sangli › बापू बिरू वाटेगावकर अनंतात विलीन

बापू बिरू वाटेगावकर अनंतात विलीन

Published On: Jan 17 2018 3:03PM | Last Updated: Jan 17 2018 3:47PM

बुकमार्क करा
इस्लामपुर: वार्ताहर

दीनदुबळ्यांचा कैवारी आणि सर्वसामान्यांचा आधारवड अशी ओळख निर्माण करणारे बापू बिरू वाटेगावकर (वय ९६) आज अनंतात विलीन झाले. मंगळवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज बोरगाव येथे कृष्णाकाठी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

वाचा : असा होता बोरगावचा ढाण्या वाघ 

तत्पूर्वी, गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेला हजारोंनी उपस्थिती लावत त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी गावातील सर्व व्यवहार उत्स्फूर्तरित्या बंद ठेवण्यात आले होते. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तसेच बापू बिरू वाटेगावकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इस्लामपूरच नव्हे, तर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित झाले होते. 

बापू बिरू वाटेगावकर यांच्या मागे एक मुलगा, सुना, नातवंडे, एक बहिण असा परिवार आहे. बोरगाव (ता. वाळवा) येथे एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या बापू बिरू यांच्यावर लहानपणीच मजुरी करण्याची वेळ आली. त्यांना कुस्तीची आवड होती. त्यांच्या ऐन उमेदीच्या काळातच गावगुंड, सावकारांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला आणि पश्चिम महाराष्ट्रातील रॉबिनहुड अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.  

वाचा : बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

Image may contain: 5 people, people standing

Image may contain: 1 person, crowd, sky, wedding and outdoor

Image may contain: 2 people, crowd and outdoor

Image may contain: 6 people, crowd and outdoor