Thu, Jul 16, 2020 08:03होमपेज › Sangli › बागणी, शिगावसह पाच गावांत बंद

बागणी, शिगावसह पाच गावांत बंद

Published On: Jul 28 2018 1:40AM | Last Updated: Jul 28 2018 12:24AMबागणी : प्रतिनिधी

मराठा आरक्षण जाहीर करण्यात सरकार टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी बागणी, शिगाव, ढवळी, काकाचीवाडी या चार गावांमध्ये ग्रामस्थांनी बंद पाळला.

बहादूरवाडी, कोरेगाव येथे बुधवारी बंद पाळण्यात आला होता. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन प्रार्णापण केलेले काकासाहेब शिंदे यांना आदरांजली वाहण्यात आली.  सकाळी बागणी येथे प्रमुख कार्यकर्ते, मराठा समाज बांधवांची बैठक होऊन सरकारने तत्काळ मराठा आरक्षण जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करण्यात आला.

शिगाव येथे देखील बंदचे आवाहन करण्यात आले होेते.  ढवळी येथे देखील आज कडकडीत बंद पाळण्यात आला. काकाचीवाडी येथे बंद पाळून शासनाने तातडीने मराठा आरक्षण जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. 

राज्य शासनाने तातडीने मराठा आरक्षण देण्याची घोषणा केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. ढवळी येथेही गावकर्‍यांनी उत्स्फूर्त बंद पाळला.