Wed, Nov 14, 2018 07:59



होमपेज › Sangli › मावा खायला न दिल्याने तरुणावर चाकूहल्ला 

मावा खायला न दिल्याने तरुणावर चाकूहल्ला 

Published On: Jan 14 2018 7:38PM | Last Updated: Jan 14 2018 7:38PM

बुकमार्क करा




कुपवाड : वार्ताहर

मावा खायला न दिल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला आहे. ईश्वर तातोबा बंडगर (वय- ३५,रा.कापसे प्लॉट) असे हल्‍ला झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. तर, ओंकार सगरे असे हल्‍ला करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. या हल्‍यात ईश्वर बंडगर हा गंभीर जखमी झाला असून, त्‍याला उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.  याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून, संशयित आरोपी फरार झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी ईश्वर बंडगर रविवारी (दि.14) सकाळी साडेनऊच्या सुमारास अहिल्यानगर चौकातील एका पान पट्टीवर मावा खात थांबला होता. यावेळी संशयित ओंकार सगरे पानपट्टीजवळ येऊन ईश्वरची चेष्टामस्करी करत मावा खाण्यास मागू लागला. ईश्वरने त्याला मावा देण्यास नकार दिल्याने त्याने चिडून ईश्वरला  शिवीगाळ करत खिशातील धारदार चाकू काढून ईश्वरवर हल्ला केला. 

यावेळी दोघांत बराचवेळ झटापटही झाली. ओंकार सगरेने ईश्वरच्या उजव्या खांद्यावर व पाठीवर दोन खोलवर वार केल्याने प्रचंड रक्तस्राव झाला. या घटनेनंतर ओंकार फरार झाला आहे. 
घटनेची माहिती कुपवाड पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. जखमी ईश्वरला उपचारासाठी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. रविवारी रात्री उशिरापर्यंत संशयित ओंकार सगरेला अटक करण्यात आली नव्हती.  हवालदार जमादार तपास करीत आहेत.