Mon, Nov 19, 2018 23:48होमपेज › Sangli › विहापूर येथे महिलेचा खून

विहापूर येथे महिलेचा खून

Published On: Apr 18 2018 12:53AM | Last Updated: Apr 17 2018 11:43PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील  विहापूर येथे शेतजमिनीच्या वादातून लाकडी दांडके डोक्यात घालून  वनिता जालिंदर भोंगे (वय 35) या महिलेचा   दिराने   खून केल्याची घटना झाली आहे. ही घटना सोमवारी घडली. यावेळी मारामारीत मृत महिलेचे पती जालिंदर महादेव भोगे (वय 40) हे जखमी झाले आहेत.   संशयित नारायण महादेव भोंगे (वय 36) याला अटक करण्यात आली आहे. 

कडेगाव पोलिसांनी दिलेली   माहिती अशी की, विहापूर येथील जालिंदर महादेव भोंगे व त्यांचा भाऊ संशयित आरोपी नारायण यांच्यात शेतजमिनीचा वाद होता. सोमवारी   रात्री 8.30 वाजता संशयित नारायण दुचाकीवरून जालिंदर यांच्या घरासमोर आला. त्याने जालिंदर यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही मारामारी सुरू असताना पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या वनिता यांच्या डोक्यात नारायण याने लाकडी दांडके जोराने मारले. वनिता जागीच कोसळल्या. त्यांना उपचारासाठी कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान,  जालिंदर  भोंगे यांनी  कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे . नारायण याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दि. 22 एप्रिल पर्यंत (सहा दिवसांची) पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी करीत आहेत.

Tags :at vihapur woman murder,sangli news