Tue, Feb 19, 2019 08:52होमपेज › Sangli › विविध मागण्यांसाठी विट्यात आशा कर्मचारी रस्त्यावर (Video)

विविध मागण्यांसाठी विट्यात आशा कर्मचारी रस्त्यावर (Video)

Published On: Jan 17 2018 2:24PM | Last Updated: Jan 17 2018 2:30PM

बुकमार्क करा
विटा : विजय लाळे 
हम सब एक है , हमारी मांगे पुरी करो वरना कुर्सी खाली करो,  मानधन नको , वेतन द्या या घोषणांसह सरकारमान्य आरोग्य कार्यकर्त्या अर्थात आशा महिला विट्यात रस्त्यावर उतरल्या. या महिलांनी तहसीलदार रंजना उबरहंडे यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. 

देशपातळीवर कार्यरत असलेल्या दहा केंद्रीय कामगार कर्मचारी संघटना आणि राष्ट्रीय फेडरेशन्सने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत तब्बल १ कोटीहून अधिक योजना कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आज बुधवारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खानापूर तालुक्यातील ३ आरोग्य केंद्रातील १२२ आशा आणि ६ गट प्रवर्तकांसह महिला कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून आज विट्यात मोर्चा काढला. 

या वेळी त्यांनी सरकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधी धोरणाबाबत नेटाने आवाज उठवला. येथील शिवाजी चौकातून पुढे महसूल भवनापर्यंत हा मोर्चाचे गेला त्यानंतर सभेत रूपान्तर झाले. या वेळी आम्हाला कामगार म्हणून मान्यता द्या, किमान वेतन १८ हजार द्या, दरमहा वेतन ३ हजार द्या, कुटुंबीयांना मेडिक्लेम द्या आदी मागण्या करण्यात आल्या. यात खानापूर आशा संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्षा कमल बोले, कुंदा कांबळे , शांता जाधव, शोभा भोसले, प्रतिभा कारंडे, जयश्री बेले, नीता खरात, सविता कदम आदींची भाषणे झाली.