Mon, Aug 19, 2019 17:55होमपेज › Sangli › 'स्मशानातील सोन्यासाठी' सांगलीत राख चोरी

'स्मशानातील सोन्यासाठी' सांगलीत राख चोरी

Published On: Jul 24 2018 12:01PM | Last Updated: Jul 24 2018 12:01PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीतील स्मशानातील राखेची पुन्हा चोरी झाली आहे. स्मशानातील राखेची चोरी होण्याची एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे. आता स्मशानभूमीतील राखही सुरक्षीत राहिली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

राखेची सोन्याच्या हव्यासापोटी चोरी होत असून ही राख नदीकाठी चाळून हाडे फक्त बाजूला टाकली असल्याचे मृतांच्या नातेवाईकांना सकाळी दिसून आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत संतप्त नागरिकांनी महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस यांना चांगलेच धारेवर धरले. 

पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर नातेवाईकांनी क्रियाक्रम उरकले.