Fri, Nov 24, 2017 20:21होमपेज › Sangli › मी पळून जाईन, तुम्हालाही पळायला लावीन

मी पळून जाईन, तुम्हालाही पळायला लावीन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

सांगलीतील अनिकेत कोथळे याच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने तपासादरम्यान एका अधिकार्‍याला ‘मी तुमच्या तावडीतून पळून जाणार आहे’ असा  इशारा दिला होता अशी माहिती मिळाली. ‘मी पळून गेल्यावर तुम्हालाही पळायला लागेल’, असाही त्याने  इशारा दिल्याची माहिती मिळाली.

वाचा : निलंबित सात पोलिसही ‘सीआयडी’च्या रडारवर

वाचा : सांगलीः वादग्रस्त कामटेवर वरदहस्त कोणाचा?

सांगलीतील अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर सांगली शहर पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक कामटे याच्यासह काही पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. अटकेत असलेल्यांना मिरज ग्रामीण पोलिस ठाणे, कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाणे व अन्य पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. कामटेला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशी दरम्यान, एका अधिकार्‍याच्या ताब्यात तो होता. त्यावेळी कामटे याने ‘तुमच्या तावडीतून पळून जाईन आणि मग तुम्हाला पळावे लागेल’, असा इशारा दिल्याची माहिती मिळाली. 

वाचा : साहेब मारा... पण जाळू नका