Wed, Nov 14, 2018 00:07



होमपेज › Sangli › अनिकेत कोथळेचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला (व्हिडिओ) 

अनिकेत कोथळेचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला (व्हिडिओ) 

Published On: Jan 11 2018 3:54PM | Last Updated: Jan 11 2018 4:00PM

बुकमार्क करा




सांगलीः प्रतिनिधी

चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पीएसआय युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी अनिकेतचा पोलिस कोठडीतच खून केला. त्यानंतर आंबोलीतील कावळेसाद येथे त्याचा मृतदेह दोनदा जाळून त्याची विल्हेवाट लावली होती. अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला होता.  

आज (गुरूवार) अनिकेतचा मृतदेह मिरज येथील शासकीय मेडिकल कॉलेजच्या ताब्‍यातून कोथळे यांच्या कुटुंबीयांकडे अंत्‍यसंस्‍कारासाठी देण्यात आला. मृतदेह दोनदा जाळल्यामुळे आणि विविध चाचण्या केल्याने मृतदेह खोक्यात घालून देण्यात आला होता. मृतदेह स्वाधीन केल्यानंतर कुटुबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

६ नोव्हेंबर २०१७ ला बडतर्फ पीएसआय युवराज कामटेने आपल्या पोलिस साथीधारांच्या मदतीने अनिकेत कोथळेची पोलिस कोठडीतच हत्‍या केली होती. त्यानंतर आंबोलीतील कावळेसाद येथे त्याचा मृतदेह दोनदा जाळून त्याची विल्हेवाट लावली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कामटेसह सहाजणांना अटक करण्यात आली. यानंतर अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता.