Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Sangli › शिक्षक आंबी खूनप्रकरणी एकास अटक

शिक्षक आंबी खूनप्रकरणी एकास अटक

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:35PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

येथील शास्त्री चौकात झालेल्या सुनील आंबी या शिक्षकाच्या खूनप्रकरणी प्रदीप संभाजी मोरे(वय 34, रा. शांतीबन कॉलनी, शंभरफुटी रस्ता) या संशयितास  पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.   मोरेच्या पत्नीस आंबी हे मोबाईलवरून फोन आणि मेसेज पाठवून सतत त्रास देत असल्याने त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.  दरम्यान मोरे याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी सहा संशयित असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

आंबी हे विश्रामबाग येथील एका शाळेत शिक्षक होते. त्याच शाळेत   मोरे याची पत्नी शिक्षिका म्हणून नोकरीस आहे. गेल्या काही दिवसापासून आंबी हे मोरे यांच्या पत्नीस मोबाईलवरून फोन आणि मेसेज पाठवून त्रास देत होते. हे मोरे याला कळाल्यानंतर दि.  26 डिसेंबररोजी रात्री साडेअकराच्या सुमारास  आंबी यांना  मोबाईलवर फोन केला. चर्चा करायची असल्याचे सांगून शास्त्री चौकात बोलावून घेतले. 
तेथे आल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्यानंतर  शंभर फुटी रस्ता परिसरात सोडून हल्लेखोर निघून गेले. त्यानंतर आंबी यांच्या नातेवाईकांनी शनिवारी पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांची भेट घेऊन हल्लेखोरांनी सोन्याची चेन आणि अंगठीही लंपास केल्याची तक्रार केली. यावेळी अंबी यांंच्या कुटुंबियांनी एका संशयिताचे नावही पोलिसांना सांगितले हो.  गेल्या दोन दिवसांत चौकशी करून पोलिसांनी बुधवारी रात्री मोरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पत्नीला त्रास देत असल्यानेच आंबी यांना प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून सांगून येथील शास्त्रीचौकात रात्री बोलावून घेतले. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. मोरे याच्यासह त्याच्या साथीदारांनी आंबी यांच्या डोक्यात पाईप आणि काठीने मारहाण केली. 

लूटमार भासवण्यासाठी अंगठी, चेन पळवली
सुनिल आंबी यांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोन्याची चेन काढून घेण्यात आली. लूटमारीसाठी मारहाण झाली असावी, हे भासवण्यासाठीच हे कृत्य केल्याची कबुली मोरे याने पोलिसांना दिली आहे.